मैत्रिण

"मित्र" अर्थ हरवून बसलेला हा शब्द आता स्वतः ही हरवू लागला आहे. तसेच "मैत्रीण" या शब्दातल्या गोडव्यासोबत तो शब्द ही विरत चालला आहे.
परवा एका मित्राशी बोलताना, नव्हे, चॅटींग करताना मी सहज म्हणून गेले 'मैत्रीणी साठी ईतकं ही करू शकत नाहीस का?'
तर उत्तर आल "मैत्रीण? फार दिवसांनी आला ग हा शब्द समोर. कसंतरीच झालं." यावर मी काय बोलावं ते सुचेना.

Bestie, bro, bff, dude हे असले शब्द ज्याला आपले वाटतात त्याला मैत्रीण यातला गोडवा अन जिव्हाळा नाही समजायचा म्हणून तो विषय सोडला.

पण मैत्रीण वाचून कसंतरी वाटणार्या त्याने आई वडीलांना "ही माझी जुनी मैत्रीण " म्हणून ओळख करून देताना हसूच आलं. 

Comments

Popular posts from this blog

So I'll live.

Rang de Zindagi ! Splash your life with the colours of life !

Old souls