Posts

Showing posts from August, 2019

असंच काहीतरी- मनापासून...

आयुष्य हे असंच असतं, जे आपल्याला आवडतं ते सहज मिळत नसतं. पण, जेव्हा मिळतं, तेव्हा त्याच्यासोबत काय करायचं हेच माहीत नसतं. त्याकडे फक्त पाहत बसूनही चालणार नसतं आणि चुकीचा निर्णय घेणे ही चालणार नसतं. मग अश्यावेळी करायचं तरी काय? कुणाचा घ्यायचा सल्ला ? कोण देईल मनापासून सल्ला? आई? वडील? भावंडं? की मित्र? काहीच समजत नाही. कोणीही कसाही सल्ला देईल पण निर्णय अन् परिणाम याचा फक्त आपल्या स्वतःशी संबंध असणार मग स्वतःच स्वतःला सल्ला द्यायचा कसा? अन् स्वतःचा सल्ला चुकीचा ठरला तर मग दोष कुणाला द्यायचा याची कोंडी! मन हे असंच असतं. पळवाटा शोधणारं, भीतीत राहणारं, सतत अनावश्यक विचार करणारं.. त्याला कोण काय करणार? विचारचक्र बंद करावं म्हटलं की ते आणखी वेगाने धावू लागतं अन् त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं की मग ते सगळे विचारच् गप्प बसतात आणि गप्प बसले एकदाचे म्हणून सुस्कारा सोडताच् पुन्हा बोलायला लागतात. मन ही फारच अफलातून गोष्ट आहे. भीतीत राहुनही कोणाच्या आज्ञेत ते राहत नाही, कोणाचं काही ऐकत नाही अगदी ज्याचं ते मन आहे त्याचंही! पण तरी मन हे मन आहे आणि मनाचंच् सारं राज्य आहे. मन राजा, कान-नाक-डो