असंच काहीतरी- मनापासून...

आयुष्य हे असंच असतं, जे आपल्याला आवडतं ते सहज मिळत नसतं. पण, जेव्हा मिळतं, तेव्हा त्याच्यासोबत काय करायचं हेच माहीत नसतं. त्याकडे फक्त पाहत बसूनही चालणार नसतं आणि चुकीचा निर्णय घेणे ही चालणार नसतं. मग अश्यावेळी करायचं तरी काय? कुणाचा घ्यायचा सल्ला ? कोण देईल मनापासून सल्ला? आई? वडील? भावंडं? की मित्र? काहीच समजत नाही. कोणीही कसाही सल्ला देईल पण निर्णय अन् परिणाम याचा फक्त आपल्या स्वतःशी संबंध असणार मग स्वतःच स्वतःला सल्ला द्यायचा कसा? अन् स्वतःचा सल्ला चुकीचा ठरला तर मग दोष कुणाला द्यायचा याची कोंडी!

मन हे असंच असतं. पळवाटा शोधणारं, भीतीत राहणारं, सतत अनावश्यक विचार करणारं.. त्याला कोण काय करणार?

विचारचक्र बंद करावं म्हटलं की ते आणखी वेगाने धावू लागतं अन् त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं की मग ते सगळे विचारच् गप्प बसतात आणि गप्प बसले एकदाचे म्हणून सुस्कारा सोडताच् पुन्हा बोलायला लागतात.

मन ही फारच अफलातून गोष्ट आहे. भीतीत राहुनही कोणाच्या आज्ञेत ते राहत नाही, कोणाचं काही ऐकत नाही अगदी ज्याचं ते मन आहे त्याचंही!

पण तरी मन हे मन आहे आणि मनाचंच् सारं राज्य आहे.
मन राजा, कान-नाक-डोळे त्याचं मंत्री मंडळ. मन राजा चंचल तरी मंत्री मंडळ स्थीर. डोळे प्रधान. सगळ्यांच्या सल्ल्याशिवाय मन राजा पर्यंत काही काही पोहोचत नाही.

या मनाची एकाग्रता साधायला लोकं वेगवेगळे प्रयोग करतात. पण ज्याचा गुणधर्मच् चंचलतेचा आहे तो शांत होईल तरी कसा? अन् व्हावा तरी का? 

Comments

  1. Kya baat hai. Ekdam mast lihila ahe.👐

    ReplyDelete
  2. राजकुमारी मन कसं असतं मनाबद्दल तु जे विचार मांडले स की माझ्या मनाला खूप भावले ,आई म्हणून मला तुझं कौतुक करायला मी एवढी शब्द सम्राज्ञी असून माझच मन इतकं आनंदानं भरून आलंय की माझे शब्द सुद्धा तुझं कौतुक करायला अपुरे पडतात ग तुझ्या मनावर तू अशीच राज्य करत रहा आणि ते मन सतत सदैव आशावादी राहून प्रसन्न प्रफुल्लित हसत राहणार रहावं राहील असे माझे तुला शुभाशीर्वाद आहेत माझी मुलगी म्हणून मला तुझा खूप खूप अभिमान आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

So I'll live.

The Old Times

Old souls